तू अशी का वागतेस

तू ओठाने कमी अन् डोळ्याने जास्त बोलतेस,
चेहऱ्याने शांत असतेस पण मनात खूप काही साठवतेस,
माहित नाही का पण नेहमी अस वाटत तू सारखी आठवणीतच हरवलेली असतेस,
तू हसलीस तरीही स्वतःसाठी हसतेस असे कधी वाटतच नाही,
मनातील दुःखाचा डोंगर तुझा तुझ्या डोळ्यात कधी दाटतच नाही,
सगळं विसरून तू पुढे सरकतेस,
पन मागेही काहीतरी ठेवून आलोय हे मात्र तू सारखं वळून बघतेस,
इतक्या सुंदर चेहऱ्यामागे तू एवढं दुःख कसे काय लपवतेस,
खरं सांगू मला ही अजून समजलेले नाही तू अशी का वागतेस...।।

Comments

Popular Posts