प्रेम

कोणाची तरी काळजी, कोणाची तरी आस,
कोणीतरी स्पेशल, कोणीतरी सगळ्यात खास,
कोणाचं तरी सुख, त्यासाठी सगळी धडपड,
कोणाचं तरी दुःख, त्यामुळे दिवसरात्र रडरड,
कोणाचं तरी काम, त्यासाठी जीवाचं रान,
कोणाची तरी चूक आणि त्याचा दुसऱ्यावरच राग,
कोणालातरी मिळवायची इच्छा, कोणालातरी गमवायची भीती,
कोणाची तरी आठवण, कोण्या एकाच्या नसण्याने साऱ्या आयुष्याची माती,
सगळी दुनिया विरोधात तरीही आनंद, कोण्या एकाच्या विरोधामुळे मात्र आभाळभर त्रास,
लाखो माणसाची गर्दी, पण गर्दीत त्या एकाचा भास,
तो एक म्हणजेच प्रेम ...।। mazishayari.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular Posts