तू

भासतेस मज मृगजळ तू दिसता क्षणी विरतेस,
निखळ बालमनासारखे हास्य तुझे तू हसुनी काळजात घर करतेस...।।
डोळ्यात तुझ्या तू कधी हर्ष कधी अश्रू दाटवतेस,
दुःख बाजूस सारूनी तू सुख या जीवनात साठवतेस...।।
नात्यात तुझ्या हजारो बंधने पर साऱ्या बंधनात तू प्रेम देतेस,
त्रास सारा तू सहन करूनी मला फक्त ख़ुशी देतेस...।।

Comments

Popular Posts