भावना

शब्दात भावना गुंतवतो की, तुझ्यात गुंतलेल्या भावना शब्दात मांडतो काहीच समजत नाही,
समजेलही पण कदाचित समजून घ्यावस वाटत नाही.
काही प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यात गुरफटून जाण्यात जास्त मजा असते...।।
तू ही असाच एक प्रश्न आहेस,
कधी वाटत तुला विचारावं तुला मी आवडतो का...??
नाही नको ,
बस मला तू आवडतेस मग यावेगळ काय हवं,
तुझा होकार की नकार याने काय फरक पडणार आहे,
प्रेम माझं तुझ्यावर आहे आणि ते तसच रहाणार आहे,
मन तुझं आहे कदाचित त्याला दुसरं कोणी आवडत असेल,
तू फक्त माझीच आहेस हा फक्त माझा एक भास असेल,
पण हा भास मन सुखावतो,
तुझ्या डोळ्यात स्वतःला पाहतो,
तुझ्या ह्या डोळ्यात एक तुरुंग आहे,
हजारो कैद असतील त्यात त्यापैकीच मी एक आहे,
तुझ्या ओठावर अमृत असल्यासारखे भासते,
अमृत सहजच कसे मिळेल त्यासाठी समुद्र मंथन करून विष प्राशन करावे लागते,
तुझ्या केसात एक काळोखी रात्र आहे,
तुझे केस चेहऱ्यावर येताच तुझा चेहरा त्यातून पाहताना अमावस्यच्या रात्री पूर्ण चंद्र उगवल्यासारखे वाटते,
हे असं सुंदर शरीर तुझं फक्त मन मोहून टाकत,
खरं तर तुझं बोलणं आणि साफ मन हे तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडत....।।

Comments

Popular Posts