मी एक मुलगी आहे

शरीराने थोडी कमजोर पण मनाने खंबीर आहे,
प्रत्येक वेळी लढायला तयार राहावं लागतं मला कारण मी एक मुलगी आहे...।।
दिसायला सुंदर असेल तरच माझी किंमत आहे,
साफ मनाने जर का मुलासोबत बोलले तर मी छपरी आहे,
माझं चालण, माझं बोलणं सर्व काही दुसऱ्याच्याच मर्जीने आहे,
प्रत्येक गोष्टीच उत्तर द्यावे लागते मला कारण मी एक मुलगी आहे...।।
लग्नाअगोदर घरची लग्नानंतर सासरची मी इज्जत आहे,
पण मी जर माझं मत मोकळेपणाने मांडले तर मी बेअब्रू आहे,
बापासाठी लेक नवऱ्यासाठी बायको तर मुलासाठी आई आहे,
माझं स्वतःच असं वेगळं अस्तित्वच नाही कारण मी एक मुलगी आहे...।।
माझी किंमत आजही माझ्या गुणाने कमी आणि सौंदर्याने जास्त आहे,
मी जर काही करून दाखवलं तर तारीफ कमी आणि माझ्यावर दया जास्त आहे,
शरीराचे भुकेले आजही मला विकत घेत आहे,
प्रश्न फक्त एवढाच आहे, खरंच मला विकत घ्यायला मी काय वस्तू आहे,
मुलाचे गुण न पाहता पैसा पाहून माझं लग्न होत आहे,
खरतर आज माझेच आईबाप मला विकत आहे कारण मी एक मुलगी आहे...।।

Comments

Popular Posts