स्वप्न

स्वप्न म्हणजे काय...???
स्वप्न म्हणजे कल्पना, जी कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करत असतो.
स्वप्न म्हणजे इच्छा, ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कोणत्याही थराला जायला तयार असतो.
स्वप्न म्हणजे प्रेम, एकतर्फी प्रेम ज्याला मिळवण्यासाठी आपण होईल तो प्रयत्न करत असतो.
स्वप्न म्हणजे आशा, अशी आशा जी आपल्याला प्रत्येक दुःखातून सावरण्यास मदत करते.
स्वप्न म्हणजे निराशा, अशी निराशा जिच्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या सुखांचा आनंद लुटता येत नाही किंबहुना आपल्याला आनंदच होत नाही.
स्वप्न म्हणजे खरं तर जीवन , नाही कदाचित स्वप्न म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आपण जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हाच कुठे कोणत्यातरी एका मार्गाने चालायला लागतो.
जेव्हा आपलं काही स्वप्नच नसत तेव्हा आपण फक्त जगत असतो एका जागेवर.
माणूस या जीवनाचा प्रवासी तेव्हाच होतो जेव्हा तो स्वप्न पाहतो.
म्हणजे थोडक्यात स्वप्न म्हणजे मार्ग... जीवन जगण्याचा मार्ग...।।

Comments

Popular Posts