आज ती दिसली नाही

खूप प्रयत्न केला पण आज झोप काही लागली नाही,
कारण फक्त एवढच आज ती दिसली नाही...।।
तिच्या डोळ्यातील ते प्रेम दिसलं नाही,
तिच्या ओठावरील ते हसू दिसलं नाही,
तिच्या गोड आवाजात माझं नाव ऐकलं नाही,
तिच्या त्या भिरभिरणाऱ्या नजरेत माझा शोध दिसला नाही,
खूप प्रयत्न केला पण आज झोप काही लागली नाही,
कारण फक्त एवढच आज ती दिसली नाही...।।
तिचे दिवास्वप्न ऐकून आज हसलो नाही,
तिचे ते वेड जीवापाड प्रेम पाहून डोळ्यातून अश्रू ओघळले नाही,
माझा हात जरी तिच्या हातून सुटला तरी तिच्यावर कोसळणारा तो दुःखाचा डोंगर आज पाहिलाच नाही,
तिचा तो थांबलेला श्वास मला पुन्हा सुरु करताच आला नाही,
तिचे ते जळणारे शरीर मला विझवताच आले नाही,
खूप प्रयत्न केला पण आज झोप काही लागली नाही,
कारण फक्त एवढच आज ती दिसली नाही...।।

Comments

Post a Comment

Popular Posts