महादेव तू

डोळ्यात तू , स्वप्नात तू,
सत्यात तू, साक्षात तू,
रागात तू, अनुरागात तू,
श्वासात तू, रक्तात तू,
दाही दिशातुन, माझ्या मनातून,
वाहतोस तू , महादेव तू महादेव तू...।।१।।
कृत्यात तू, नृत्यात तू,
कर्मात तू, धर्मात तू,
मेंदूत तू,ज्ञानात तू,
वाऱ्यात तू, साऱ्यात तू,
दाही दिशातुन, माझ्या मनातून,
वाहतोस तू , महादेव तू महादेव तू...।।२।।

Comments

Popular Posts