एक दिवस

एक दिवस असा असावा ,
तुझा हात माझ्या हातात असावा ।।
एक दिवस असा असावा,
तुझा श्वास माझ्या श्वासात असावा ।।
एक दिवस असा असावा,
तुला माझा नि मला तुझा भास व्हावा ।।
एक दिवस असा असावा,
माझ्या डोळ्यात तुझ्या अश्रूंचा बांध फुटावा ।।
एक दिवस असा असावा,
तुझ्या हसण्यात माझा हात असावा ।।
एक दिवस असा असावा,
तुझ्या मनात तुला माझाच चेहरा दिसावा ।।
एक दिवस असा असावा,
मला जाताना पाहून तुझ्या ओठावर हसू अन् डोळ्यातुन अश्रूंचा एक थेंब वहावा ।।

Comments

Popular Posts