महाराष्ट्र माझा ऐसा
शिवरायांचा हा वारसा,
शौर्याचा हा आरसा,
सर्वांसाठी जरी सारखा,
तरी सर्वांहुन आहे वेगळा,
महाराष्ट्र माझा ऐसा, महाराष्ट्र माझा ऐसा..।।
न्यायाचे दोन्ही विधाते या भूमीलाच पावले,
विचारू नकोस कधी कोणी काय दिले,
स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाईंनी येथेच रोवला,
जातीभेद तोडणारा राजा कोल्हापुरी जन्मला,
इतिहास इतका प्रचंड इथला कि सांगण्यास हा जन्म नाही पुरेसा,

छत्रपती, महात्मा, भारतरत्न, लोकशाहीर, सर्वांचेच पहिले पाऊल या भूमीवर पडले,
वेळोवेळी दिल्लीला ही यांनी आपल्या पायी झुकवले,
कसे सांगावे संयुक्त महाराष्ट्रा साठी किती महात्म्यांचे रक्त सांडले,
त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातूनच भविष्य आमचे घडले,
या भूमीवरील बलिदान सांगण्यास शब्द मला पुरेना,

Best poet...👌👌👌
ReplyDelete