व्यर्थच सार काही

खूप दिवस झाले सांगेन म्हणतोय पण सांगू वाटत नाही,
प्रेम इतकं झालंय तुझ्यावर की शब्दात मांडता येत नाही,
असेल मनात तुझ्या मी ही पण मला माहीत नाही,
तूच सांग ना तुझ्या मनातले कारण तुला मिळवण्याच्या आनंदापेक्षा तुला गमवायची भीती जास्त आहे हे कसं तुला कळत नाही,
हो मी थोडा वेडा आहे मला काहीच समजत नाही,
पण नाती जशी क्षणात जोडता येतात तशी मला ती क्षणात तोडता येत नाही,
तू मिळालीस तर जग मिळालं तू नाहीस तर मी स्वतः स्वतःचा नाही,
माझा श्वास माझं हृदय माझी आत्मा तुला पाहिल्याशिवाय चालतच नाही,
या नात्यात बंधन ही नाही आणि स्वातंत्र्य ही नाही,
तू नसल्यास हे जीवन काय अन् मृत्यू काय माझ्यासाठी व्यर्थच सार काही...।।

Comments

  1. व्यर्थ आहे जीवन मृत्यूची वाणी, हे प्रेम तुझ्यावर असले तरी जीवनाची गाडी तु नसलीस थांबु देणार नाही. पण तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा जे आई - वडील माझ्यासाठी जीवाची रान करुन कष्ट करतात हे जीवन फक्त त्यांच्याच साठी.......!!

    ReplyDelete
    Replies
    1. मस्तच भावा धन्यवाद

      Delete

Post a Comment

Popular Posts