Chhatrapati Sambhaji Raje ( Shambhu Raje ) Jayanti Vishesh

गनिमांच्या तलवारी ला धार कमी त्याहुनी धारधार नजर ऐसी,
दिल्लीचा बादशहा ही कापे विचारी स्वराज्याची ही नशा कैसी ।।
ना पैसा ना सत्ता ना जहागिरी याकडे,
तरीही त्यासाठी मरण्यास तयार मर्द रांगडे ।।
ना शूद्र श्रेष्ठ ना जातीवाद इथे प्रधम धर्मास प्राधान्य,
समजेना औरंगजेबास कैसे रोखावें हे शंभू वादळ ज्याचे वाढतच चाललंय स्वराज्य ।।
आता मात्र कहर झाला लाखो चा फौजफाटा हजारो साठी कमी पडू लागला,
हे पाहूनी औरंगजेबाने एक डाव मांडला ।।
गद्दाराशी मैत्री केली त्यांस थोडी जहागिरी दिली अन् बनवले फितूर घरातीलच,
तळपणारा सूर्याचा अस्त झाला पण शौर्याने नव्हे बैमानींने सत्य मात्र एवढंच ।।
                                 
                                              ...आशुतोष गायकवाड

Comments