Marathi kavita Aaj punha paus padla
आज पुन्हा पाऊस पडला, अन् पुन्हा तिची आठवण आली,
ती ही होती एखाद्या पावसासारखी,
मी चुकलो की माझ्यावर बरसनारी,
माझ्या मिठीत येऊन मला सुगंधीत करनारी,
माझ्या ओठावरील तहान तिच्या ओठाने भागवणारी,
सारखी माझ्यावर विजेसारखी कडाडणारी,
अगदी पावसाच्या थेंबासारखी निखळ आणि स्वच्छ मनाची,
पण कितीही स्वच्छ आणि निखळ असला तरीही पावसाचा प्रत्येक थेंब हा मातीतच पडतो,
पाऊस कितीही मनमोहक असला तरी कधी न कधी साथ सोडतो,
कितीही ओरडल ये रे ये रे पावसा तरीही पाऊस हवा तेव्हा येत नाही,
पण पाऊस थांबला आणि ऊन पडलं म्हणून कोणी जगणं थांबवत नाही...।।

Comments
Post a Comment